पीयूष मिश्रा: उन्मादी ते जिंदादील via इन्कलाबी

Piyush Mishra Hindi poem

 ‘एक बगल मे चांद होगा, एक बगल मे रोटीया’ या अगोदर बऱ्याच वेळा ऐकलेलं हे गाणं. पण यावेळेस नकळतपणे या गाण्याच्या शब्दरचनेकडे लक्ष गेलं. ते एकदमच भावलं. गीतकार, गायक शोधायला लागलो. नाव शोधले दोन, सापडलं एकच पियूष मिश्रा. हा तर तोच Image is everything, everything is image (Rockstar) वाला. हा गीतं लिहितो, गातो, अभिनय करतो, दिग्दर्शन करतो, कथा(स्क्रिप्ट) लिहितो, गीत दिग्दर्शन करतो. भन्नाट आहे की हा माणूस!

जसा जसा पियूष बद्दल वाचत गेलो, त्याच्या मुलाखती, त्याचा बल्लीबारण बँड, त्याच्या अनेक कविता.. ही NSD वाली वेगळीच असतात! चित्रपटांमध्ये येण्या अगोदर दिल्लीला असताना नाटकं गाजवली. आवडतील त्या भूमिका केल्या. गीतकार, अभिनय, लेखन, स्टेज माघे, स्टेज पुढे सगळं करून पाहिलं. त्याच्या नाटकांना गर्दी पण व्हायची. एकपात्री प्रयोगांना तिकिटे ब्लॅक मध्ये विकली जात. मध्ये एकदा मुंबईला काही स्वप्न घेऊन आला पण दिल्लीच्या ओढीने परत गेला.

वयाच्या आठव्या वर्षी ‘झिंदा हो तुम हा कोई शक नही’ लिहिणारा, दहाव्या वर्षी स्वतः affidevit देऊन स्वतःचं नाव बदलणारा, भौतिकशास्त्र-रसायनशास्त्रवर चिडणारा, बालवयात पेंटिंग-गाण्यात रमणारा, पुढे NSD मध्ये शिक्षण, मैने प्यार किया मधला सलमानचा रोल ऑफर झालेला, स्वतःला कलाकार न समजता दैविक देणगी म्हणणारा, कोणत्याही कॉलेजच्या आवारात घुसून तिथे रमणारा, युवकांशी विशेष नातं जोडणारा, निवडणुक प्रचारात स्वतःचं गाणं वापरल्यामुळे चिडणारा असा….

पीयूषच्या बोलण्यात वारंवार गुलाल चित्रपटाचा उल्लेख येतो. अनुराग तरुण वयात दिल्लीमध्ये असताना पीयूषच्या नाटकांच्या प्रयोगाला जायचा. तिथेच तो पियूषचा चाहता झाला होता. पुढे अनुरागनेच त्याला गुलाल दिला. यांच्या काही भेटीत पियूषणे त्याच्या जुन्या कविता अनुरागला ऐकविल्या. त्याने जशाच तशा त्या गुलाल मध्ये वापरल्या. मी गुलाल पहिला. डोक्यात फक्त त्यातली गाणी आणि गीतच आठवत होती. अनुराग वर पियूष भारीच पडलाय. संवाद, गाणे, संगीत वाहवा. गुलाल बद्दल नंतर कधी बोलू. 

तो गांधीला प्रचंड मानतो. विचारांनी थोडा डावीकडे झुकलेला. पण मी डावा नाही म्हणतो कारण तो घनघोर ईश्वरवादी आहे. भगतसिंग वर ‘गगन दमामा बज्यो’ नाटक केलं, यातूनच दारू, रागीट स्वभाव यातून बाहेर पडायला भगत सिंगची मदत घेतली. त्याला वाटतं हिंदू मुस्लिम दंगे होऊ नयेत. याबद्दल लिहितो सुद्धा. त्याच्या बऱ्याच रचना एक सामाजिक-राजकीय प्रक्रियेतून जन्मलेल्या असतात.

हुसना, घर, दुनिया, यारा मौला, आरंभ है प्रचंड, शहर, रात के मुसाफिर, एक बगल में अशी अनेक गीतं. गुलाल, रॉकस्टार, पिंक, गॅंग्स ऑफ वासेपुर, तमाशा यांत अभिनय. बरीच नाटकं लिहिली, जगली. शायरी, कविता  प्रकाशन. बल्लीमारण बँड घेऊन कॉलेजांमध्ये फिरतो आणि बरंच..

शेवट पीयूषणे त्याच्या पूर्व आयुष्यावर लिहिलेल्या त्याच्याच एका शायरी ने करतो.

दर बदर की ठोकरो का लुफ्त पुछो क्या सनम

आवारगीको तो हमने अल्ला समझ लिया

जिंदगी से बात की, एक क्रश लिया फिर चल दिये

जिंदगी को धुये का छल्ला समझ लिया.